राजु भास्करे(पत्रकार) सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
1 Min Read

नासिर शहा

पिंपळखुटा प्रतिनिधि

चिखलदरा येथील नगर परिषद सभागृहात दि. 3/5/2023 ला ठिक 12 वाजता महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र अंगीकृत माविम अमरावती अंतर्गत जागर लोकसंचालीत साधन केद्र टेबुरसोंडा व सिपना लोकसंचालीत साधन केद्र चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प माध्यमातून महिला सक्ष्मीकरण करण्यासाठी तालुका स्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात 2023/2024 चा सुधारक सन्मान पुरस्कार चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील पत्रकार राजु भास्करे यांना पंचायत समिती चिखलदरा चे गटविकास अधिकारी जयंत बाबरे साहेब यांच्या हस्ते सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिखलदरा पंचायत समिती गटविकास अधिकारी जयंत बाबरे साहेब, जिल्हा समन्वय अधिकारी ऋषिकेश घ्यार साहेब,वैभव काळमेघ साहेब, सुमिर दुर्योधन साहेब, राजेश अखधज साहेब,प्रियंका इंगळे मॅडम, जयवंती ताई कास्देकर, मानकु तोटे, हेमंत आलोकर, पवन हूड, ऋषिकेश राऊत हे असुन महिला मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *