प्रतिनिधी विशाल गवई अकोट
तालुक्यातील आकोलखेड येथे भिमशक्ती युवा मंडळाच्या वतीने ता.५ मे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८५ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन भगवान बुद्ध यांच्या मुर्तीजवळ करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.अत्त दिप भव स्वयम् प्रकाशित व्हा असा संदेश देऊन संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध होत.राजा सम्राट अशोक यांनी ८४,००० विहार बांधून बुध्दाचा धम्म हा जगात पोहचविला.१४ ऑक्टोबर १९५६ ला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा दिली.भगवान गौतम बुद्धांना अभिवादन म्हणून बौध्द उपासक व उपासिकांनी सामुहिकरीत्या बुध्द वंदना घेतली.त्यानंतर भोजनदान देण्यात आले.कार्यक्रमाला बौध्द उपासक व उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 17