सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जि.प.प्रार्थमिक शाळेत दि.६/५/२३ शनिवार रोजी
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवजीवन देणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला मानाचा मुजरा करून यांची १०१ व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळेस
केंद्रीय प्रमुख तथा मुख्याध्यापक एम.डी.सोनेने शालेय व्यवस्थापन समितीचे जब्बार डी तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.पी.राजपूत व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत गायकवाड यांनी केले सर्व प्रथम प्रतिमेला अभिवादन करून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार जब्बार डी तडवी व केंद्रीय मुख्याध्यापक एम.डी.सोनेने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण केले.याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक मुरलीधर सोनेने यांनी शिक्षणमहर्षी, लोककल्याणकारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. असे सांगून आपले मनोगत केंद्रीय मुख्याध्यापक एम.डी.सोनेने यांनी व्यक्त केलं यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.पी.राजपूत,शाळेतील शिक्षक सतीश ढोणे, गजानन गवयी,निता हिरास मॅडम,
जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत, शालेय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार जब्बार डी तडवी,तथा पत्रकार बंन्धू व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Users Today : 17