सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे समोर आलं आहे.
सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही? शेतकऱ्यांच्या मागणीकडं प्रशासनाचे दुर्लक्ष खरीपाची व आता रब्बीची सावळदबारा भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले बरेच शेतकऱ्यांना खरीपाची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत मिळाली नाही त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सागर देशमुख सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान भरपाईचे कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.यावर्षी सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी नारली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली होती. हाती आलेली पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, फळबागा या पिकांचे मोठं नुकसान झालं होते. शेती पिकांच्या नुकसानीसह काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. परंतु अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पासून वंचित राहावे लागत आहे.
▪️””परतीच्या पावसानंही सोयगाव तालुक्यात धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीतून वाचलेली पीक या परतीच्या पावसानं वाया गेली होती. परतीचा पाऊस लांबल्यामुळं काढणीला आलेलं पीक आडवी झाली होती. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता.मात्र सोयगाव तहशीलच्या भोंगळ कारभारामुळे सावळदबारा परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही.त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सागर देशमुख सामाजिक कार्यकर्ते शेतकरी सावळदबारा ता सोयगाव
Users Today : 17