मोलखेडा रस्तावर दिशा फलक लावण्याची; अमोल शेळके यांची मागणी

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील देवळगांव गुजरी ते सावळदबारा मुख्य रस्त्यावर घाणेगाव तांडा येथून मोलखेडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग फर्दापूर यांनी दिशा फलक लावलेच नाही आणि लावलेल्या आहे तर त्या दिशा फलक वर मोलखेडा गावाचा उल्लेख केलाच नाही.याठिकाणी दिशाफलक लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व अमोल शेळके सामाजिक कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग फर्दापूर यानां केली आहे.मोलखेडा,हिवरी हे गाव असून आसपासच्या अनेक गावातील लोकांचा संपर्क येथे रोज असतो. या गावामधूनच बुलढाणा जात असून या रस्ता वरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. घाणेगांव तांडा या ठिकाणी एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडवा लागतो. मात्र सावळदबार तसेच देवळगाव गुजरी सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनामुळे रस्ता ओलांडणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. बहुतांश अपघात या ठिकाणी घडले आहे.

रात्री बे रात्री गावाजवळ वाहने येत असतानाही रस्त्यावर दिशाफलक नसल्याने लग्राना कार्यात येणारे पाहुणे मंडळी दिशा फलक नसल्याने सरळ सावळदबारा कडे निघून जातात पुन्हा विचारपूस केल्यावर त्यांनां मोलखेडा यायला आठ कि.मी.प्रवास करावा लागतोय आहे.पुढे गतीरोधक व दिशा फलक बसविण्यात यावे. अशी मागणी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी अमोल शेळके सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *