बुलढाणा येथे इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने कोविड बद्दल चर्चा सत्राचे आयोजन कोविडची गुंतागुंत ठरते जीवघेणी ; डॉ.दिपक लध्दड

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

बुलढाणा येथील इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजन कोविडची गुंतागुंत ठरते जीवघेणी या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कोविड नंतरची गुंतागुंत ठरते जीवघेणी इंडियन डेंटल असोसिएशन बुलढाणा शाखेतर्फे निरंतर दंत वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमांतर्गत दि.६/५/२३ रोजी चिखली रोड बुलढाणा येथील हॉटेल नर्मदा इन येथे पोस्ट कोविड कॉमप्लिकेशन्स वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात इंडियन डेंटल बुलढाणा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शरद जुमडे यांनी दीप प्रज्वलन करून डॉ.दिपक लध्दड यांचा सत्कार करुन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंडियन डेंटल असोसिएशन बुलढाणा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शरद जुमडे,कार्यक्रमाला बुलढाण्यातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक लध्दड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कोरोनावर मात म्हणजे लढा संपला नव्हे त्यापेक्षाही भयंकर आहेत पोस्ट कोविड काॅम्प्लिकेशन्स या संसर्ग नंतर इतर आरोग्य विषयक समस्या पाहायला मिळत आहे.यात प्रामुख्याने थकवा झोपेशी संबंधित समस्या श्रास घेण्यास अडथळा येणे चिंता आणि नैराश्य यासारखे मानसिक आजार हृदयविकार व रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, ज्यांना कोविडची लागण झाली आहे त्यापैकी बहुतेकांना कफची तक्रार आहे, खोकला, श्र्वासोच्छावासाच्या त्रासाची समस्या आहे.ज्यांना आधीच श्र्वसनाचा त्रास ते लोक यामुळे अधिक चिंतेत आहेत.बीपीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.अशा रुग्णांसाठी मल्टी डिसिप्लनरी पोस्ट कोविड क्लिनिक ची आवश्यकता आहे अशे मार्गदर्शन डॉ दिपक लध्दड यांनी केले.ते पुढे बोलत होते की कोरोना मुक्त रुग्णांवर दंत उपचार करताना रुग्णांची रुदय क्षमता व रक्तवाहिन्यामधे झालेले बदल यांना लक्षात घेऊन दंत उपचाराचे नियोजन करावे अशा मोलाचा सल्ला डॉक्टर दिपक लध्दड यांनी दंत चिकित्सकांना याप्रसंगी मोलाचा सल्ला दिला.यावेळी या कार्यक्रमाला डॉ सचिन किनगे सेक्रेटरी आय डी,डॉ निलेश जुमडे, डॉ आरती पाटील, डॉ अभिजित जाधव, डॉ जैस्वाल, डॉ गवळी, डॉ दडाॅ, डॉ राजपूत, डॉ नरवाडे, मान्यवर,व इतर दंत चिकित्सकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.अशी माहिती डॉ शरद जुमडे यांनी बोलताना दिली.

 

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *