शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात ५ मे. शुक्रवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. त्या कार्यक्रमांतर्गत वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली होती. वन्यजीव विभागाकडून अंबाबरवा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या वन्यप्राण्यांची संख्या सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये वाघ ३, बिबट ३, अस्वल १२, नील गाय ५४, सांबर ३७, भेडकी १५, गवा ६४, रान डुक्कर ४८, लंगूर ५१, माकड ११६, रान कोंबडी २०, रान मांजर ३, मोर ८५, ससा ५, सायाळ १ असे एकूण ५१७ वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. गतवर्षी सन २०२२ मध्ये अंबाबरवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते. यामध्ये ६ वाघ, ६ बिबट, १५ अस्वल, २ तडस, ७० नील गाय, ४९ सांबर, २८ भेडकी, ४८ गवा, १७२ रान डुक्कर, २ लंगूर, १५५ माकड, ११ म्हसण्या उद, ५४ रान कोंबडी, १ रान मांजर, १५१ मोर, १० ससा, १२ सायाळ, २ कोल्हा, ७ लांडगा असे एकूण ८०१ प्राण्यांची नोंद झाली. तर यावर्षी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ५१७ वन्य प्राणी आढळून आले आहेत. दरम्यान निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पुष्ठभूमीवर सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या कडून जोरदार तयारी करण्यात आली होती. अभयारण्यात ८ नैसर्गिक २७ कुत्रिम असे एकूण ३५ पाणवठ्यावर ३५ मचान उभारूण वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. प्राणी गणने साठी १९ वनरक्षक, ५ वनपाल, ४ विशेष व्याघ्रदलाचे जवान ४२ मजूर तैनात करण्यात आले होते. यावर्षी वन्यजीव प्रेमींना प्रवेश नाकारण्यात आल्याने वन्यजीव विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्ग अनुभव कार्यक्रम पार पडला.
निसर्ग अनुभव कार्यक्रमाला वादळीवाऱ्यासह पावसाचा फटका बसल्याने गतवर्षी पेक्षा कमी वन्यप्राण्यांनी दर्शन दिले.अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोळे (वन्यजीव) सोनाळा ता. संग्रामपूर यांनी दिली.
Users Today : 17