जयपुर हैदराबाद रेल्वे गाडीला शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे.

Khozmaster
3 Min Read

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

 

शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे व रेल्वे स्टेशन ट्राफिक इन्चार्ज पीएम पुंडकर साहेब यांना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नावाने निवेदन सोपविण्यात आले आहे

मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे डिव्हिजन मध्ये येणाऱ्या कलकत्ता मुंबई लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या शेगाव रेल्वे स्टेशनवर जयपुर हैदराबाद जयपुर गाडी संख्या 12 719 व 12 720 या सुपरफास्ट गाडीला थांबा मिळावा अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .शेगाव रेल्वे स्टेशनवर स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे व रेल्वे ट्रॅफिक इन्चार्ज पीएम पुंडकर साहेब यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नावाने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की गाडी संख्या 12 719 व 12 720 हैदराबाद जयपूर हैदराबाद ही गाडी मध्यप्रदेशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या उज्जैन तसेच महाशिवपुराण कथा वाचक पंडित प्रदीप जी मिश्रा यांचे सिहोर हिंदू धर्मियांसाठी पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या राजस्थान मधील पुष्कर त्याचप्रमाणे खाटू श्याम या धार्मिक स्थळा बरोबरच मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या अजमेर कडे जाण्यासाठी हैदराबाद जयपुर ही ट्रेन सुविधा जनक आहे मात्र या रेल्वे गाडी ला शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्याने या परिसरातील यात्रेकरू भाविकांना उपरोक्त धार्मिक स्थळावर जाण्यासाठी अकोला किंवा मलकापूर रेल्वे स्टेशन वरून चया गाडीमध्ये प्रवास करावा लागत आहे त्यामुळे परिसरातील यात्रेकरूंना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे शेगाव हे श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून या भागामध्ये मध्यप्रदेश राजस्थान मधील सिहोर पुष्कर खाटू श्याम व उज्जैन तसेच अजमेर जाणारे भाविक मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव यांनी जयपुर हैदराबाद जयपूर या गाडी संख्या 12 719 व 12 720 या ट्रेनला शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करावा अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ प्रणिता धामंदे, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा सरचिटणीस कुमारी स्नेहलता दाभाडे, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा संघटक सौ मंदाकिनी चव्हाण ,कुंभार समाज महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ ज्योती बावस्कर मॅडम राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या शेगाव तालुका अध्यक्ष सौ शुद्धमती निखाडे मॅडम राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना युवा ब्रिगेडचे अध्यक्ष कुमारी कुसुम रितेश चव्हाण आदींच्या सह्या आहेत

 

0 9 3 7 6 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *