पोलिसांच्या जेवणात खडे

Khozmaster
1 Min Read

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शहरातील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जेवणात खडे आढळून आले. मॉरिस कॉलेज टी-पॉइंटच्या खाणावळीत जेवण वाढणाऱ्या केटरिंग कर्मचाऱ्यांची अस्वच्छता बघून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र पोलिस विभागातील पोलिस कर्मचारी व अधिकारी राज्यातील विविध ठिकाणांहून अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून बंदोबस्तातील पोलिसांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता १३ जणांना जेवण बनविण्याचे कंत्राट देण्यात आले. बंदोबस्तातील पोलिसांकरिता जेवणाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत.

मोर्चेकऱ्यांच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसांकरिता मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथे खानावळचे ठिकाण आहे. ऋषी भिसेन या कंत्राटदाराला रोज ८०० लोकांचे जेवण बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी पोलिस जेवण करण्याकरिता येथे आले असता त्यांना भातात खडे आढळले. पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, असा सूर पोलिसांचा होता.
0 9 3 8 2 7
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *