Nagpur Crime: इन्स्टाग्रामवरून मैत्री करीत, २३ वर्षीय युवतीवर ३१ वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी युवकास अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. राघवेंद्र उर्फ राज राधेश्याम यादव (वय ३१, रा. एमआयडीसी) असे युवकाचे नाव असून तो ट्रान्सपोर्टचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची १ मार्च २०२१ ला युवतीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ती शिकत असताना, त्याने तिच्याशी मैत्री केली. तो युवतीच्या घरीही ये-जा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सातत्याने तिला लग्नाचे आमिष दाखवित, तो विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करीत असते.
त्यामुळे तिला त्याच्यापासून गर्भधारणा झाली. हे कळताच, त्याने तिला रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपतही केला. यानंतर त्याने तिला टाळण्यास सुरूवात केली. याशिवाय दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. ही बाब युवतीला कळताच, तिने २३ नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, राघवेंद्रला अटक करीत, तपास सुरू केला आहे.
Users Today : 46