मागोवा ..लोकसभेचा.

Khozmaster
6 Min Read
बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या मॉं जिजाऊंचा जिल्हा आहे .बुलढाणा जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून या ठिकाणी नैसर्गिक उल्कापाताने तयार झालेले खा-या पाण्याचे सरोवर आहे तर सिंदखेडराजा येथे लखोजीराजे जाधव यांच्या घरी जन्माला आलेल्या मॉं जिजाऊ ज्यांच्या नावाने अर्थातच “मातृतीर्थ जिल्हा” बुलढाणा म्हणून नावारुपाला आलेला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खासदार जाधव यांच्या कर्मभूमी मेहकर येथे अकरा फुटांची तिरुपती बालाजींची पाषाणाची अखंड मूर्ती , मेहकर जानेफळ रोडवर कंचनीचा महाल म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली पुरातन कालीन वास्तु आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर वेगवेगळ्या उद्योगांसाठी प्रसिद्ध असून अस्सल चांदीचे शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात खामगावची ओळख आहे.तसेच विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी संत गजानन महाराजांची नगरी म्हणजेच शेगांव तिर्थक्षेत्र सुध्दा बुलढाणा जिल्ह्यातीलच आहे.बुलढाणा जिल्ह्याला सन १९८० साली इंदिरा काँग्रेसचे खासदार म्हणून बाळकृष्ण वासनिक हे खासदार होते त्यानंतर १९८५ मध्ये इंदिरा काँग्रेस आणि अंतुले कॉंग्रेस असे दोन गट पडले त्यामध्ये इंदिरा काँग्रेस कडून बाळकृष्ण वासनिकांचे चिरंजीव मुकूल वासनिक तर अंतुले कॉंग्रेसचे उमेदवार लक्ष्मण जाणुजी घुमरे ह्यांच्यात मुख्य लढत होऊन मुकूल वासनिक सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर १९९० साली निवडणूक होऊन पुन्हा मुकूल वासनिक निवडून आले परंतु या दरम्यान बाळकृष्ण वासनिक आणि मुकूल वासनिक यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विरोधी लाट सुरु झालेली होती आणि १९९२ मध्ये मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या आणि सिंदखेडराजा येथील सुखदेव नंदाजी काळे यांना भारतीय जनता पक्षाने बुलढाणा लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आणि त्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात “बंद करा बापलेकांचे चाळे आणि निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे” हा नारा गाजला आणि सुखदेव काळे ह्या अतिशय सर्वसामान्य माणसाने मुकूल वासनिकांचा धक्कादायक पराभव केला परंतु सुखदेव काळे यांना खासदारकीचा अत्यल्प काळ मिळाल्याने ते बुलढाणा जिल्ह्याचा पाहिजे असा विकास करु शकले नाहीत.
त्यानंतर पुनःश्च १९९५ साली निवडणूक झाली आणि मुकूल वासनिक केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री झाले मात्र ते सुद्धा नागपूर चे असल्याने त्यांनीही बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.त्यानंतर पुन्हा निवणूका झाल्यानंतर शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांनी मुकूल वासनिकांचा पराभव केला आणि ते सुद्धा केंद्रीय अर्थराज्यमंत्री झाले परंतु ते सुद्धा इंद्रनगरी अमरावतीचे असल्याने त्यांनीही सलग पंधरा वर्षे खासदारकी उपभोगून बुलडाणा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध असलेली शासकीय शाळा कॉलेजेस आणले नाहीत आणि कोणत्याही एम. आय. डी. सी. सुरु करण्यासाठी केंद्रशासनाकडे मागणीही केली नाही किंवा पाठपुरावाही केला नाही तरीही ते त्यानंतर बुलढाणा लोकसभा हा मतदारसंघ ओपन होईपर्यंत खासदारपदी कायम होते. सांगायचे तात्पर्य एवढेच की बुलढाणा जिल्हा १९८० साली जसा होता तसाच जवळपास तब्बल ४० वर्षांपासून आजही तसाच आहे..!
          यामध्ये प्रामुख्याने मुख्य फरक फक्त एवढाच आहे की विदर्भाचे सुपूत्र केंद्रीय दळणवळण व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांचे जे जाळे विणले त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गुळगुळीत व भव्य रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. तात्पर्य  एवढेच की लोकप्रतिनिधी जर कां उदासीन असले आणि विकासाभिमुख नसले की जिल्ह्यातील तरुण निराशेच्या गर्तेत सापडून व्यसनाधीन होतात ,संपूर्ण युवापिढी बरबाद होते व सर्वसामान्य नागरिकांना केवळ आणि केवळ निराशेला बळी पडावे लागते अशीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्याची झालेली आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा २००९ साली ओपन झाल्यानंतर खासदार आनंदराव आडसूळांनी शिवसेनेचा गड म्हणून निर्माण केलेली ओळख “मेहकरचे भूमिपुत्र” प्रतापराव जाधव यांनी विजय संपादन करीत सार्थ ठरवले आणि कालांतराने शिवसेनेच्या गडाचे नामकरण “प्रतापगड” असे करण्यात आले मात्र मागील दहा वर्षांपासून केंद्रात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची सत्ता असूनसुद्धा प्रतापराव बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राचा निधी खेचून आणू शकले नाही.मात्र सहा सात महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षातील इतिहासातील सर्वात मोठे बंड विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करीत राज्यात सरकार स्थापन केले तेंव्हापासून बुलढाणा जिल्ह्यात आमदार निधीतील कामे अतिशय जलद गतीने सुरु आहेत.तसेच लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने खासदार निधीचेही वाटप जोरात सुरु आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विकसित धोरण खोळंबली तरी खासदारांच्या संपत्तीचा आलेख मात्र शेकडो – हजारो कोटी पल्याड गेला आहे…!
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार सोबत घेऊन शिंदे शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांच्या सरकारमध्ये सहभाग घेतला यावेळी राज्यातील ४० ते ५० आमदारांसह शिवसेनेचे १८ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामध्ये प्रतापराव जाधव हे विदर्भातून सर्वात आघाडीवर होते त्यानंतर राज्यात अनेक नाटकीय घडामोडी सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे १६ आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुरु असून सुप्रीम कोर्टाने त्यांना निकाल देण्यासाठी जी तारीख दिली होती ती तारीख एकदम जवळ आली असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे हे जरी खरे असले तरी आता तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी केंद्राचा निधी खेचून आणतील काय..!
 अशी जोरदार चर्चा संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सुरु असून याबाबत प्रतापराव जाधव कोणती भूमिका घेतात.वर्तमान तोरण+मरणभेटी = राजकारण  यांवर भोवळली जाणारी भाबडी जनता वारसात आपल्या पुढच्या पिढीला मागासलेला, बेरोजगार, जिल्हा देणार की नवीन चेहरा पसंती दर्याशवणार  याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे तूर्तास इतकेच…..
0 9 4 6 9 0
Users Today : 40
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *