आज भारतरत्न श्रद्धेय अटलजींची जयंती. यासोबतच आजच्याच दिवशी पुणे शहरातील डेक्कन येथे भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन त्याचे लोकार्पण अटलजींच्या शुभहस्ते करणाऱ्या माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांचा जन्मदिन. ही बाब म्हणजे विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. आज सुरेशनानांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून नानांचे अभिष्टचिंतन केले. तसेच, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ७५ कष्टकरी मातांचा सन्मान केला. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी खासदार प्रदीपदादा रावत, भाजपा नेते सुनीलजी देवधर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 44