छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर-गंगापूर.
आरोग्य सेवेच्या प्रश्न व समस्याचा पाऊस वैजापूर छत्रपती संभाजीनगर
वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दन्तरोग तज्ञ
वैदयकीय अधिकारी डॉ,सोनाली सायंबर या रुग्णालयात मनात येईल तेंव्हा येतात महिने दोन महिन्यातून एखाद्या दिवशी येतात,रुग्णांना तपासात नाहीत,त्या रुग्णांशी अत्यंत उद्धटपणे वागतात,आपल्या वरिष्ठांचे ही ऐकत नाहीत असा एक तक्रार अर्ज दंत रुग्ण रौफ इनामदार यांनी दि,१२-१२-२०२३ रोजी दिला, या अर्जाचा संदर्भ देत जिल्हा आरोग्य देखरेख समितीचे सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी या समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी बोलावलेल्या जिल्हा आरोग्य देखरेख समिती बैठकीत बुधवार (ता,२७)रोजी त्यांच्या निदर्शनास आणुन दिले,यावर या समितीचे सचिव जि,प,आरोग्य अधिकारी डॉ,अभय धानोरकर यांनी या विषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,मोतीपवळे याना चौकशी करण्याचे पत्र देऊन संबधिताचा चौकशी अहवाल शासनाकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले ,या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय वैजापुरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ,गजानन टारपे उपस्थित होते,
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांनी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत आरोग्यासाठी सामाजिक कृती यासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचे प्रश्न मार्गी लागावेत,प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्र,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय येथील स्वच्छतेचे प्रश्न,पिण्याच्या पाण्याचे प्रश्न,रुग्ण कल्याण समिती खर्च रजिस्टर नसणे,अंबुलन्स नादुरुस्त असणे,प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समिती
गठीत केलेली नसणे,रुग्णालयांचे छत प्लास्टर कोस
रुग्णालयांचे छत प्लास्टर कोसळणे,वैद्यकीय अधिकारी,व सहायक यांनी मुख्यालयी राहणे,या दोन्ही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन गृह नसणे इत्यादी गैरसोयी चित्रफिती द्वारे प्रत्यक्ष फोटो दर्शवून समितीच्या बैठकीत समनवयक अन्नपूर्णा ढोरे यांनी सादर केल्या,या प्रसंगी एम, जी,व्ही,एस चे आप्पासाहेब उगले यांनी विशद केले की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने देऊ केलेल्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तळा गाळातिल घटकापर्यंत पोहचाव्या हा संस्थेचा उद्धेश आहे, आरोग्यासाठी सामाजिक कृती ही प्रक्रिया अधिक बळकट व लोकाभिमुख होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत व यात लोकसहभाग वाढावा या साठी प्रयत्न व्हावेत असे उगले म्हणाले,या समितीचे सचिव जिल्हा आरोग्य
आरोग्य अधिकारी डॉ,अभय धानोरकर यांनी या बाबत जिल्हा परिषद मार्फत योग्य सूचना जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयाना देण्यात येतील असे सांगितले,या प्रसंगी सुवर्णा जाधव,डॉ,सागर डोले, आर,के,एस, च्या मनीषा खंडागळे,जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विकास मेश्राम, सतीश नागुडे, विशाल पडवळ,विनायक मुंडे,श्री बागडे,यांची उपस्थिती होती,समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी सूत्र संचलन केले,आभार बापू वाळके यांनी मानले,
Users Today : 33