चिमूर तालुक्यातील श्री गुरुदेव सेवा मंडळ, केसलाबोडी येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या अधिष्ठानाचे दर्शन घेतले आणि उपस्थित गुरुदेव भक्तांशी वार्तालाप केला. दरम्यान, उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले.
यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा तालुका महामंत्री हेमराज दांडेकर, चिमूर कृ.उ.बा. समिती सभापती मंगेश धाडसे, चिमूर कृ.उ.बा. समिती उपसभापती रविंद्र पंधरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, माजी सभापती/नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, सरपंच्या नानीबाई चौखे, उपसरपंच कवडू चौखे, भाजपा बूथ अध्यक्ष मंसाराम नन्नावरे, नारायण चौखे व अन्य मान्यवर आणि गुरुदेव भक्त उपस्थित होते.
Users Today : 44