किवळ ता.कराड येथील शिवकालीन तळ्याचे सुशोभिकरणास रक्कम रूपये ७.०० कोटी मंजूर झाले असून, सदर तळ्याच्या सुशोभिकरणाचे काम सुरू असून, त्याची पाहणी आज केली.

Khozmaster
2 Min Read
किवळ ता.कराड येथील शिवकालीन तळ्याचे सुशोभिकरणास रक्कम रूपये ७.०० कोटी मंजूर झाले असून, सदर तळ्याच्या सुशोभिकरणाचे काम सुरू असून, त्याची पाहणी आज केली.
दरम्यान याठिकाणी तलीमगृहाचे काम सुरु असून त्याची देखील पाहणी केली.
याप्रसंगी माजी उपायुक्त तानाजीराव साळुंखे, विजय मारुती साळुंखे, रामराव साळुंखे, संगीता साळुंखे(माई), सरपंच प्रदीप काशीद, युवराज साळुंखे, हिंदुराव नलवडे, शिवाजीराव साळुंखे, विष्णू साळुंखे, किसन पावशे, कैलास साळुंखे, चेअरमन कृष्णत साळुंखे, रामभाऊ साळुंखे, सुहास साळुंखे, सुनील साळुंखे, सौ दिपाली साळुंखे, सौ आशा पावशे, सौ पार्वती जाधव, सावित्रा पवार सौ रेश्मा मुलाणी, सुरेश साळुंखे, शिवाजी साळुंखे, राहुल साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपकार्यकारी अभियंता गिरीश सावंत, शाखा अभियंता आर. एस.टोपे, ठेकेदार कदम, सचिन पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
किवळ ता. कराड येथे पुरातन शिवकालीन तळे आहे. या तळ्याचे शेजारी प्राचीन जानुबाई व गणेश मंदिरे आहेत तसेच सुमारे ७० गुंठे क्षेत्राचा परिसर आहे. सदर तळ्याच्या सुशोभिकरणासाठी महाविकस आघाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध झाला आहे.
याठिकाणी तळ्याच्या व मंदिर परिसराचे सुशोभिकरणामुळे किवळ गावच्या पर्यटनामध्ये व वैभवामध्ये वाढ होणार आहे. तसेच याचा फायदा स्थानीकांच्या रोजगार निर्मितीसाठी होणार आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी विरंगुळा निर्माण होणार आहे .
यामध्ये शिवकालीन तलावाचे बाजूचे घाटाचे व पायऱ्यांचे बांधकाम करणे, तळ्यासाठी संरक्षक भिंत, बैठक व्यवस्था, आवार भिंत, दगडी कामात तळ्याच्या भिंती उभारून सुशोभिकरण करणे, तळ्याच्या परिसरात जॉगींग ट्रॅक, संरक्षण भिंत, मंदिर सुधारणा, दगडी रस्ता करणे, प्राचीन गणपती मंदिरा समोर सभामंडप बांधणे व मोकळ्या आवारात जॉगींग ट्रॅक , लहान मुलांसाठी व वृध्दांसाठी बगीचा तयार करणे, मुख्य प्रवेश द्वाराचे बांधकाम करणे , प्रसाधनगृह बांधणे, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे , फुटपाथ पथदीवे, पाण्याची सोय करणे इत्यादी कामे होणार आहेत, त्यामुळे किवळ गावाचे पूर्णपणे रूपडे बदलून पर्यटकांची गर्दी होणार आहे.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *