बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे उच्च ज्ञानी, सुसंस्कृत आणि सदगुणी व्यक्तिमत्व होते.

Khozmaster
1 Min Read
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे उच्च ज्ञानी, सुसंस्कृत आणि सदगुणी व्यक्तिमत्व होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याबद्दल जनजागरण करूया.
कोल्हापुरात बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर- निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांची पुण्यतिथी आणि प्रा.बी.जी. मांगले लिखित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या जीवन चरित्रापर पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन केले होते .
प्रा.बी.जी.मांगले यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचे लिहिलेले जीवनचरित्रपर पुस्तक पुढील पिढ्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल. त्यांनी कै.एम.आर.देसाई, कै.डी.आर.माने यांच्या सहकार्याने कोल्हापूर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कागलमध्ये केली होती. अशी आठवणही सांगितली

यावेळी माजी महापौर भीमराव पवार, विक्रमसिंह खर्डेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, लेखक प्रा.डाॅ.श्रीकांत पाटील, इतिहासाचे संशोधक व अभ्यासक इंद्रजीत सावंत, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, प्रा.बी.जी.मांगले आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचे वंशज विक्रमसिंह खर्डेकर यांच्या हस्ते माझ्या सत्कार झाला.
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असलेले ते लेखक, विचारवंत, शिक्षक, शिक्षणतज्ञ तर होतेच.तसेच; स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेत ते अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. देशातील सर्वात जास्त दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन ते खासदार झाले होते.देशाचे पहिली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही त्यांची इंग्लिशमधील अभ्यासपूर्ण भाषणे ऐकून प्रभावित झाले होते.
0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *