राज्यस्तरीय पुरस्काराने जेष्ठ पत्रकार राजकुमार चिंचोळकर सन्मानित

KHOZ MASTER
2 Min Read
पातूर  –  ऑल जर्नालिस्ट अँड  फ्रेंड सर्कल,ए जे एफ सी या  पत्रकार संघटनेच्या वतीने नांदेड येथे २४ डिसेंबर  ला  पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले .या वेळी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील  पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजकुमार चिंचोळकर यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात  संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे जाणकार जेष्ठ पत्रकार  जतीन देसाई  तर प्रमुख अतिथी निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,  ए जे एफ सी चे  संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल ,केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, सचिव  बाळकृष्ण कासार, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य  पदाधिकारी निलेश पोटे, प्रदेश कार्याध्यक्ष  राहुल कुलट, विदर्भ उपाध्यक्ष  बाळासाहेब गणोरकर ,जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी , जिल्हा सचिव प्रा .एल डी .सरोदे प्रामुख्याने  उपस्थिती होते .
या वेळी
 वाडेगाव येथील पत्रकार  राजकुमार चिंचोळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल ,गौरवचिन्ह ,सन्मानपत्र देऊन येथोचित सन्मान करण्यात आला . राजकुमार चिंचोळकर गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यारत आहेत .यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत .गेल्या महिन्यात नागपूर येथे त्यांना  नागपूर येथे मदत या संस्थेद्वारा प्रतिष्ठेचा महात्मा फुले समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता . त्यांचे पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे .या बाबत ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल च्या वतीने त्यांना राज्यस्तरीय  पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . या केली ए जे एफ सी चे अकोला जिल्हा सरचिटणीस शामराव सुलताने ,जिल्हा संघटक हारुन देशमुख , तालुका अध्यक्ष भिमकिरण दामोदर ,देवराव परघरमोर ,मदन तायडे , तालुका कार्याध्यक्ष संतोष मोरे , सुरेश घ्यारे ……………. अक्षय पाटील
आदींसह राज्यातील ए जे एफ सी संघटने चे पदाधिकारी व सदस्य यांची  उपस्थिती होती .
0 9 7 3 0 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *