शिरूर तालुका प्रतिनिधी – विजय कांबळे ! शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात येत आहे, डॉक्टर सुजित शेलार, लहू कुमार पाडळे,
शिरूर – ड्रायव्हर लोकांकडून जर अपघात झाला तर सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची कारावासाची शिक्षा या सरकारच्या कायद्याच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात शिरूर तालुक्यात आंधळगाव येथे सरकारच्या विरोधात ड्रायव्हर लोकांनी संप पुकारला आहे तसेच या संपाला शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे व सरकारने त्वरित हा कायदा पाठीमागे घ्यावा असे डॉक्टर सुजित शेलार व लहू कुमार पाडळे यावेळी म्हणाले. ड्रायव्हर लोकांकडून जर अपघात झाला तर
सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची कारावासाची शिक्षा ड्रायव्हरला देण्यात येईल असा कायदा केल्यामुळे हा संप सर्व ड्रायव्हर लोकांनी एकत्रित येऊन पुकारला आहे. याला पाठिंबा देण्यासाठी शिरूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार तसेच शिरूर तालुका काँग्रेस युवा उपाध्यक्ष लहूकुमार पाडळे भरत गणपत अडसूळ, साळुंखे ड्रायव्हर व सर्व ड्रायव्हर उपस्थित होते.
शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने या संपाला पाठिंबा देण्यात येत आहे, डॉक्टर सुजित शेलार, लहू कुमार पाडळे,
Users Today : 32