पारनेर प्रतिनिधी – तालुक्यातील भाळवणी येथील रहिवाशी असलेल्या कै. गं. भा. गिताबाई जगन्नाथ आमले यांचे शनिवारी दिनांक ३० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. भाळवणी आणि परिसरात अत्यंत शिस्तबद्ध सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावामुळे त्यांना सर्व लोक आपले मानत असत. उच्च विचारांच्या त्या पुरस्कर्त्या होेत्या. अत्यंत सुसंस्कृत परिवार म्हणुन त्यांनी आपल्या परिवाराची ओळख निर्माण केली होती. भाजपचे नेते व पारनेर बाजार समितीचे माजी संचालक श्री. संभाजी आमले यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा श्री. संभाजी जगन्नाथ आमले एक मुलगी श्री. आशा अनिल कावरे तसेच सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भाळवणी व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रियाविधी सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता भाळवणी ता. पारनेर नागेश्वर मंदिराजवळ होणार आहे. दशक्रियाविधी निमित्त ह. भ. प. श्री. यशवंत महाराज थोरात यांचे प्रवचन होणार आहे.
Users Today : 14