छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत एका क्लिकवर – मिळणार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा –
‘यु-डायस’मध्ये परमनंट एज्युकेशन नंबर स्कुल, टीचर पोर्टल समावेश प्रा.योगेश चोपडे याची माहिती
सोयगाव: एका क्लिकवर विद्यार्थ्याच्या – इयत्ता पहिली ते १२ वीचा शैक्षणिक – डेटा आता उपलब्ध होवू शकणार आहे. त्याच बरोबर शाळेच्या व शिक्षकांच्या माहितीसाठी स्वतंत्र पोर्टलचा समावेश करण्यात आला आहे.’यु-डायस प्लस’ प्रणाली अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना परमनंट एज्युकेशन नंबर दिला जाणार आहे. – यातच विद्यार्थ्यांची ती माहिती (कुंडली) राहणार आहे.पहिली ते बारावीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘पेन’ हा नंबर दिला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक डेटा एकत्रीत मिळविणे सोयीचे जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची माहिती ‘यु-डायस प्लस’च्या माध्यमातून दरवर्षी एकत्रीत केली जाते. यापूर्वी विद्यार्थ्यांना स्टुडंट नॅशनल कोड नंबर दिला जात होता. आता त्याऐवजी ११ अंकी कोड नंबर दिला जाणार असल्याची माहिती नॅशनल मराठी शाळेचे प्रा योगेश चोपडे मुख्याध्यापक यांनी बोलताना सांगितले.हा नंबर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. भविष्यात शाळा व महाविद्यालयांकडून दिलेल्या आयडी कार्डवरही हा ११ अंकी नंबर येण्याची शक्यता आहे.राज्य मंडळासह सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा नंबर दिला जाणार आहे. पेनमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, आई-वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, वर्ग, जन्म दिनांक, आधार माहिती, आरोग्य माहिती, जनरल रजिस्टर नंबर तसेच शैक्षणिक प्रगतीचा आलेख राहणार आहे.
सोयगाव तालुक्यातील केंद्रातील गतवर्षीच्या पटसंख्या नोंदणीवर नजर टाकल्यास इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी असून सर्वांची माहिती अपडेट करण्यात येत असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी दैनिक केसरीशी’ बोलतांना सांगितले’यु-डायस’मध्ये स्टुडंट्स बरोबर स्कुल, टीचर पोर्टल समावेश;
‘यु-डायस’मध्ये स्टुडंट्स बरोबर स्कुल, टीचर पोर्टल समावेश करण्यात आला आहे असल्याची माहिती नॅशनल मराठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश चोपडे यांनी सांगितले.
टीचर : या पोर्टलवर शिक्षकांची नियुक्ती पासून ते आजपर्यंत सर्व माहिती शैक्षणिक पात्रता, नियुक्ती व बदलीची नोंद, नियुक्ती प्रवर्ग, व्यावसायिक पात्रातेसह संगणकीय ज्ञान, कौशल्ये आत्मसात असल्याची माहिती टीचर पोर्टल मध्ये समाविष्ट असल्याचे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी दैनिक केसरीशी’ बोलतांना सांगितले.
Users Today : 28