काटोलमधील मोर्चात सरकारला ईशारा काटोल, प्रतिनीधी नुकसान होवून त्याची मदत मिळत नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालास बाजारात भाव मिळत नाही. तरी राज्य सरकार याकडे लक्ष देत नसुन कुंभकर्णीय झोपेत आहे. कुंभकर्णीय झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन तिव्र करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी दिला. ते काटोल येथील मोर्चाला संबोधीत करतांना बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी अनिल देशमुख व माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात काटोल व नरखेड तालुक्यातील आज शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. सध्या विदेशातुन मोठया प्रमाणात कापासाची आयात केलेल्या कापसाचे भाव पडले आहे. कापसाच्या संदर्भातील आयात निर्यात धोरण निर्यात करुन १४ हजार रुपये भाव द्यावा. याच पध्दतीने सोयाबीलला ८ हजार रुपये भाव द्यावा. बांग्लादेशमध्ये विदर्भातील संत्राची निर्यात होते. परंतु निर्यात कर हा १८ रु. वरुन तो ८८ रु. वर करण्यात आला. यामुळे निर्यात होत नसल्याने संत्राला भाव मिळत नाही. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा करावा. मोठया प्रमाणात तुरीची डाळ आयात केल्याने तुरीचे भाव सुध्दा पडले आहे. १४ हजार रुपये भाव असलेली तुर आता ७ हजारावर आली आहे. मोठया प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान होवूनही अद्यापही ४० टक्के शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही. पिक विमाची मदत देण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करतात. २० रुपये २५ रुपये ५० रुपये अशी मदत देवून सरकार शेतकऱ्याची चेष्टा करीत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. सरस्वती मंदीर येथुन निघालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाली होते. यावेळी सरकारच्या विरोधात नारे देत निघालेल्या या मोर्चात मागण्याचे फलक सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. अनेक शेतकऱ्यांनी गळयात संत्रा व कापसाच्या माळा घातल्या होता. मोर्चा आंबेडकर चौक येथे आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलतांना माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांनी सरकार कश्या प्रकारे शेतकऱ्यांची पिळवुन करीत आहे याचा फाडाच वाचला. भाजपाचे नेते जातीपातीचे राजकारण करुन मुळ प्रश्नावरुन पळ काढत असच्याचा आरोप सुध्दा त्यांनी यावेळी केला. सभा संपल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात देण्यात आले. बॉक्स… अनिल देशमुखांकडुन “लावरे तो व्हिडीओ” विरोधी पक्षात असतांना भाजपाचे नेते कश्या मागण्या करीत होते याचे व्हिडीओच अनिल देशमुख यांनी यावेळी दाखविले. विरोधी पक्ष नेता असतांना देवेंद्र फडणविस यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी २०१३ मध्ये केली होती. त्यानंतर ते स्वत: २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी सोयाबीनला भाव दिला नाही. त्याच सोयाबीन व कापसाला भाव देण्याची मागणी कराना व्हिडीओ अनिल देशमुख यांनी जनतेला दाखविला. यासह अनेक व्हिडीओ दाखुन त्यांनी भाजपाच्या नेत्यांचा बुरखाच फाडला
Users Today : 22