टिटवी – पळसखेडा येथे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप

Khozmaster
1 Min Read
 ग्रामसेवक एस जी काळे याचा मुख्याध्यापक यांनी केला सत्कार
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण गवळी, सरपंच संध्याताई भागवत जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा चैताली दीपक गौलखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर ग्रामसेवक सुरेश काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप करण्यात येऊन त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अरुण गवळी व सरपंच संध्याताई भागवत जाधव यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच संध्याताई भागवत जाधव, ग्रामसेवक सुरेश काळे,उपसरंच लहू राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, सरपंचपती भागवत जाधव, ग्रामपंचायत सदस्य, दिलीप जाधव, कयूम तडवी, शालेय व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, पोलीस पाटील डी टी राठोड, माजी सरपंच अज्ञानसिंग राठोड, ताराचंद राठोड, प्रमोद पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील, विनोद जाधव, शांताराम राठोड, निनाजी जाधव, शिक्षणप्रेमी संदीप जाधव, दुवराज राठोड,विष्णू राठोड, शिक्षक मुकुंद मेमाणे, गोपाल चांदणे, नितीन मोरे,रमाकांत जाधव, डी आर मख सर, दीपक सैतवाल, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *