ग्रामीण भागासह गावागावांत मिरवणुका, फटाक्यांची आतिषबाजी;प्रा जीवन कोलते पाटील
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्याने तालुक्यात शनिवारी सकाळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.सावळदबारा गावात मिरवणुका, गुलांची उधळण, फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.प्रा.जीवन कोलते पाटील यांनी व मराठा बांधवांनी यावेळी एक मराठा लाख मराठाच्या जयघोषाणे सावळदबारा नगरी दुमदुमली होती.कुणबी नोंदी मिळून आलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे. आंदोलना दरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे लाखो मराठ्यांसह मुंबईला उपोषाण करणार होते. वाशीपर्यंत मराठ्यांचे वादळ धडकलेही होते. मात्र शुक्रवारी रात्री राज्यशासनाने तोडगा काढत मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या व मराठा समाजाने परिसरात डाभा,मोलखेडा,देव्हारी,हिवरी, फर्दापूर व सावळदबारा एकच जल्लोष साजरा केला.आदी गावांमध्ये मिरवणुका काढुन जल्लोष साजरा करण्यात आला. यात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.अशी माहिती प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते सावळदबारा ता सोयगाव यांनी बोलताना दिली.
Users Today : 23