सोयगाव,सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांवर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे वचेॅस्व

Khozmaster
3 Min Read

विरोधकांचा केला पुर्ण सुपडा साफ; सभापती धरमसिंग चव्हाण

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 
सोयगाव राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सिल्लोड सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड सोयगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल लागला असून अठराच्या अठरा जागेवर विरोधकांचा सुपडा साफ करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.अशी माहिती सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी बोलताना दिली.ते पुढे म्हणाले की मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघावर असलेली आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या युतीच्या उमेदवारांना मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले.
साडेपाच हजार मतदार संख्या असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मागील दहा दिवसांपासून सिल्लोड सोयगाव तालुक्यात दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचारात कुठल्याही प्रकारची कसर बाकी ठेवली नव्हती. या निवडणुकी दरम्यान अयोध्या राम मंदिर व मराठा आरक्षण या दोन महत्त्वाच्या घटना घडामोडी घडल्या यामुळे निवडणूक निकालाबाबत अनेक जाणकार तर्कवितर्क लावत होते. परंतु सोमवारी आलेल्या निकालानंतर अनेकांचे अंदाज फोल ठरले.
या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या ‘जय श्रीराम विकास पॅनल’चे विजयी उमेदवार दारासिंग बंडू चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी झाले.व त्यांच्या पॅनलच्या पण उमेदवारांना भरघोस मते मिळवून विजयी झाले.उमेदवारांना  मिळालेली मते पुढील प्रमाणे सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ काळे प्रभाकर दयाळराव ७४३, गव्हाणे
दामोदर रामराव ७४६, चिंचपुरे जयराम आनंदा ७२६, तायडे केशवराव यादवराव ७६२, पाटणी सुनील सुंदरलाल ६७७, शिंदे अरुण भिकनराव ७२१, साळवे श्रीरंग आनंदराव ७२३ सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ :- मोरे अनुसयाबाई कौतिकराव ८२०, रहाटे शालिनी नानासाहेब ७६१ सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ सहारे नंदकिशोर विठ्ठलराव ८१२, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती ताठे सतीश हरीदास ७७५, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ चव्हाण दारासिंग बंडू ७७५, दाभाडे विश्वास संपत ७५५ ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघ पाडळे राजाराम म्हातारजी ७६९ ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ राऊत संदीप एकनाथ ७९३.व्यापारी मतदारसंघ लाठी रमेश मदनलाल ६३३, लोखंडे भाऊराव पाराजी ५८७ हमाल तोलारी मतदारसंघ शेख जावेद शेख जाहीर ८७७.
 शहरातील शेवंताबाई मंगल
कर्मचायांच्या उपस्थितीत ८ वाजता टेबलवर मतमोजणी प्रारंभ झाला होता अशी माहिती सरपंचपती सुरेश चव्हाण तथा सामाजिक कार्यकर्ते घाणेगांव तांडा यांनी दिली.सुरुवातीला सर्व मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे गठ्ठ करण्यात आले व त्यानंतर उमेदवार प्रतिनिधींच्या समोर मतमोजणी प्रक्रिया शांततेत संपन्न झाली.ही संपूर्ण निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्र बाहेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे विजयसिंग राजपूत यांनी आपल्या सहकायांसह कडक बंदोबस्त ठेवला होता.निवडणूक निकाल जाहीर होताच मतदान केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला तर काही उमेदवारांची नादा तांडातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या अशी माहिती सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *