शिरूर येथे दिव्यांग महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

Khozmaster
2 Min Read

शिरूर प्रतिनिधी:-फैजल पठाण
शिरूर शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने २९ जानेवारी रोजी शिरूर येथील छत्रपती कॉलनी येथे दिव्यांग महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने शहराच्या विविध ठिकाणाहून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा तज्ञिका कर्डिले यांनी अतिशय खेळीमेळी च्या वातावरणामध्ये सुरुवात केली, या कार्यक्रमाची सुरुवात नवीन व जुन्या उखाण्यांनी झाली, तसेच अनेक दिव्यांग महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, श्रुतिका ताई आणि रंजन भैया झांबरे यांच्या पुढाकार्याने दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमामुळे खूप आनंद वाटतो. आणि या कार्यक्रमांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या भेट वस्तू दिल्या जातात. आणि आम्हाला जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो.
या कार्यक्रमासाठी जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संचालिका तसेच माजी नगरसेविका मनिषा ताई कालेवार, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, ज्ञानगंगा विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापीका सुनंदा लंघे, वासले सिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाखारे, पांडुरंग अण्णा थोरात विद्यालय आमदाबादच्या मुख्याध्यापीका स्वाती थोरात, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा तज्ञिका कर्डिले, शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा सुवर्णा सोनवणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस शकीला भाभी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस रूपाली पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिरूर शहर सरचिटणीस शमशाद भाभी , राष्ट्रवादी महिला शिरूर शहर सरचिटणीस रूपाली कोठारी ,मनीषा गव्हाणे, निर्मला गिरे, ललिता पोळ, डॉक्टर वैशाली साखरे, शिल्पा बढे, संपदा राठोड ,नम्रता गवारे, पत्रकार शोभा परदेशी आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *