भिकाजी पंडित यांच्या धाडसाला शिरूरकरांचा सलाम…

Khozmaster
2 Min Read
खोजमास्टर शिरूर प्रतिनिधी:-फैजल पठाण

  शहरातील सुभाष चौक येथील सराफ दुकानात घुसून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरांचा जीवाची पर्वा न करता भिकाजी पंडित यांनी धाडसी प्रतिकार करुन दुकान मालक व दुकानाचे संरक्षण केल्याबद्दल त्यांच्या धाडसाचे कौतुक करून शिरूर शहरातील नागरिकांच्यावतीने शिवसेवा मंडळ येथे त्यांचा नागरीसन्मान करण्यात आला.
       यावेळी कुलथे सराफ दुकानाचे मालक व माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे,माजी नगरसेवक मंगेश खांडरे,माजी नगरसेविका ज्योती लोखंडे, कॉग्रेसचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष रामदास थोरात,नाभिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब क्षिरसागर,शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे,व्यापारी महेश बोरा,मनसेचे रविंद्र गुळादे,सुशांत कुटे,अविनाश जाधव,नितीन काळे,दिनेश कळमकर,नाभिक संघटनेचे रणजीत गायकवाड,गणेश शिंदे,गोरख गायकवाड,नितीन गायकवाड,संतोष शिंदे,अध्यक्ष सनी थोरात,प्रितेश फुलडाळे,संतोष गायकवाड,तेजस गायकवाड,बंडु लोखंडे,डॉ.जोशी,प्रशांत बोरा,सचिन चोरडिया यांसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
      माजी नगराध्यक्ष व सराफ दुकानाचे मालक अशोक कुलथे यांनी घडलेल्या घटनेबाबत बोलताना सांगितले की,चोरांच्या हातात पिस्तूल असताना सुद्धा भिकाजीने न घाबरता चोरांचा प्रतिकार करून माझे आणि दुकानाचे संरक्षण केले.भिकाजी हे मोठ्या भावाप्रमाणे असून कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगताना कुलथे भावनिक झाले होते.
       यावेळी बोलताना सर्वांनी कुलथे सराफ येथे कामास असलेले भिकाजी पंडित यांनी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांकडे पिस्टल असतानाही न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता कडाडून प्रतिकार केल्याने चोर पळुन गेले.पंडित यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे दुकानात असलेले दुकान मालक व माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे व दुकानाचे संरक्षण करून दाखवलेल्या धाडसाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.प्रस्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.
0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *