तळोजा प्रदूषणाने बेजार, नागरिकांच्या तक्रारीनंतर एमपीसीबीने संबंधित यंत्रणांना विचारला जाब

Khozmaster
2 Min Read

पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली आहे, पनवेलच्या विकासाची स्वप्ने दाखवून मतदारांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. परंतु वर्षांनुवर्षे तळोजा परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरणारा प्रश्न सुटू शकलेला नाही. चार दिवसांपूर्वी पहाटे रसायनांच्या उग्र दर्पाने तळोजातील रहिवाशांना असह्य त्रास झाला. अखेर नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित यंत्रणांकडून खुलासा मागितला आहेपनवेलमधील तळोजा फेज २ परिसरात पहाटेच्या वेळी रसायनांचा उग्र दर्प येण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रसायनांसारखा दर्प येऊ लागल्यामुळे गाढ झोपेत असलेल्या नागरिकांची झोपमोड झाली. ही दुर्गंधी इतकी असह्य होती की, उकाड्यामुळे उघडलेल्या खिडक्या बंद करण्याची वेळ नागरिकांवर आली. तळोजा फेज २ परिसरात नव्या लोकवस्ती वाढत आहेत.

या रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास होण्याची ही पहिली वेळ नाही. शेजारी असलेल्या तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांमधून येणाऱ्या दर्पाचा येथील रहिवाशांना नेहमीच त्रास होत असतो. तळोजातील रहिवासी राजीव सिन्हा यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना ईमेल करून या प्रकाराची तक्रार केली. शनिवारी पहाटे पुन्हा काही प्रमाणात दुर्गंधी आल्याचे सिन्हा यांचे म्हणणे आहे. सिन्हा यांनी केलेल्या तक्रारीनंतर सीईटीपीतील पाण्याचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाचणीसाठी घेतल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार पनवेल आणि परिसरात जोरदार सुरू आहे.

विकासकामांच्या गप्पा राजकीय पदाधिकारी करीत आहेत. परंतु या निवडणुकीत तळोजातील प्रदूषणाच्या मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. नागरिकांचे मूलभूत प्रश्न निवडणुकीच्या प्रचारातून गायब आहेत, अशी टीका या भागातील नागरिक करीत आहेत.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *