आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉ. तावरेबाबत धक्कादायक माहिती

Khozmaster
2 Min Read

 पुण्यामध्ये भीषण अपघात झाला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवरून जात असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडलं. ही गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. विशेष म्हणजे अपघातानंतर या अल्पवयीन आरोपीला लगेचच जामीन मिळाला त्यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट होती.

अखेर या आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. आता या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

ससूनच्या डॉक्टरांनी चक्क अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजेवर असलेल्या डॉक्टरने अल्पवयीन मुलाच्या रक्तात दारुचा अंश आढळू शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलले. यासाठी आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पैशांचं आमिष दाखवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पुणे क्राइम ब्रांचने दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानतंर त्याला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोल यांच्यावर ब्लड सॅंपल बदल्याचा आरोप आहे. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी डॉक्टर तावरे याला कॉल केल्याचंही समोर आलं असून, त्यांच्याच सांगण्यावरून तावरेने ब्लड रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर तावरे रजेवर असतानाही त्याने डॉक्टर श्रीहरी हलनोरला रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले, असा आरोप करण्यात येत आहे.

अजय तावरेवर गंभीर आरोप

ससूनचे सुप्रिडेंटंट असताना तावरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेकदा आरोप झाले आहेत.

किडणी तस्कर प्रकरणातही तावरेंवर आरोप झाले होते.

उंदिर दंश मृत्यू प्रकरणात तावरे यांना निलंबित करण्यात आले होते.

आता अल्पवयीन आरोपीचे थेट ब्लड सॅंप्लल बदलून टाकल्याचा गंभीर आरोप आहे.

अखेर आता या प्रकरणात पुणे क्राईम बँचकडून डॉक्टर तावरेला अटक करण्यात आली आहे.

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *