लोणार येथील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करा –

Khozmaster
2 Min Read

विनायक मापारी
कार्यालय प्रतिनिधी- राज्यभर गाजत असलेल्या अवैध रेती तस्करीमुळे लोणार शहरात अद्यापर्यंत अनेक लोकांना निष्पाप आपला जीव गमवावा लागला याला सर्व स्वीकारणीभूत असलेले प्रशासकीय यंत्रणा आहे या यंत्रणेतील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा . जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात विनायक मापारी या सामाजिक कार्यक

र्त्यांनी नमूद केले आहे.
प्राप्त माहितीनुसार 27 मे रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याशी चर्चा करत सामाजिक कार्यकर्ते विनायक मापारी यांनी लोणार शहरातील रेती तस्करी मध्ये झालेल्या अपघाताची मालिकाच निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, मंठा तालुक्यामधून सुरू असलेल्या रेती तस्करीच्या टिप्पर वाहनाला जीपीएस लावण्यात यावे, रात्री सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात यावी, नदीपात्रातून रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात आहे अशा प्रकारे चोरी करणाऱ्या चोरट्या टिप्पर वाहन चालक मालक तसेच अधिकारी यांच्यावर गौण खनिज चोरी महसूल कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. बुलढाणा जिल्हा हद्दीमध्ये चेक पोस्ट उभारण्यात यावे. मूळ आधार कार्ड लाभार्थ्यांना घरकुलासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी. मृतकाच्या नातेवाईकास 30 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, कूच कामे ठरत असलेल्या पोलीस यंत्रणेला कारवाईचे आदेश देण्यात यावे अन्यथा पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालया समक्ष आमरण उपोषण करण्यात येईल अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर कडूबा आखाडे विनायक मापारी यांच्यासह इतर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत

0 9 3 8 3 2
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *