दिव्यांग पतीला विहिरीत ढकलले; पत्नीला अटक, खुनाचा गुन्हा दाखल

Khozmaster
1 Min Read

रणगाव (जि. जळगाव) : मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेत विहिरीत ढकलून देत त्याचा खून केला. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे.भवरखेडा ता.धरणगाव येथील ही खळबळजनक घटना तब्बल दहा दिवसांनी उघडकीस आली.प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) (वय ३६, रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मृत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अर्जुन शिवाजी धोबी (रा. भवरखेडा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी हिने पती प्रकाश यास तिच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने नेले.नंतर पतीचा दिव्यांगत्वाचा फायदा घेवून त्याला विहिरीत ढकलून दिले. ही घटना १२ रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.

0 9 3 8 3 4
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *