वाहतूक पोलिस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घालणे एकाला चांगलेच भोवले

Khozmaster
1 Min Read

डगाव : गोव्यात वाहतूक पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालणे एकाला चांगलेच भोवले. विलियम सोझा (३५) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो कुडतरी येथील रहिवाशी आहे. त्याच्याविरोधात येथील फातोर्डा पोलिसांनी भादंसंच्या २९१,५०४ व ३५३ कलमाखाली गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.

वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामराय नाईक पुढील तपास करीत आहेत. मडगाव वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक संजय दळवी हे तक्रारदार आहेत. बुधवार दि. १२ जून रोजी सांयकाळी दळवी हे आपल्या अन्य पोलिसांसह गस्तीवर होते. आर्ले फातोर्डा येथे रस्त्याच्या कडेला एक वाहन पार्क करुन ठेवले होते. ते वाहतुकीला अडथळा आणत होते.

दळवी यांनी ते वाहन तेथून हटविण्यास सांगितले असता संशयिताने त्यांना फोनवरुन अर्वाच्य भाषा वापरली व घटनास्थळी येऊन हुज्जतही घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी संशयिताला पकडले.

0 9 3 8 3 4
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *