पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुण-तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार करुन ते मद्यधुंद अवस्थेत होते, आणि त्यांच्यामुळेच अपघात झाला, असं कोर्टात सिद्ध करण्याची तयारी झाल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांचा आरोप काय?
पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न प्यायल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावे, याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरु आहेत, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
Users Today : 32