मुंबई : एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात सामूहिक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तिथे 14 वर्षांच्या एका मुलीवर तिच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या सहा मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. तसंच घटनेवेळी अश्लील व्हिडिओदेखील बनवल्याचं उघडकीस आलं आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
झारखंडची राजधानी रांचीपासून 160 किलोमीटर अंतरावरच्या धनसार पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध एफआयआर नोंद केला गेला आहे. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडितेने जबाबात सांगितलं, की ‘माझ्या प्रियकराने मला रविवारी सायंकाळी घरी बोलवलं होतं. मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिथं त्याचे काही मित्रदेखील उपस्थित होते. त्यांनी मला एका खोलीत बंद करून ठेवलं. त्यानंतर माझ्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशीदेखील त्याच्या इतर मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला.’
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, की ‘पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाले होते. पोलिसांनी जेव्हा मुख्य आरोपीच्या घरावर छापा टाकला तेव्हा तिथे कोणीच सापडलं नाही.’
धनसार पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज पांडे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की ‘आरोपींनी केवळ मुलीवर बलात्कारच केला नाही, तर आरोपींपैकी एकाने मोबाइल फोनवर या घटनेचा व्हिडिओ बनवला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन जप्त केला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसंच आरोपींना पकडण्यासाठी छापेदेखील टाकले जात आहेत.’
Users Today : 32