बुलढाणा: धरणगांवात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या

Khozmaster
1 Min Read

  बुलढाणा: तालुक्यातील मौजे धरणगांवात दगडाने ठेचून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याच आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की,आज शुक्रवारी सकाळी ५ ३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे धरणगांव येथील काही जण शौचास जात असतांना गावातील खंडोबा मंदिरानजीक ओपन सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला.त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांना खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला.मृतकाच्या खिशातील मोबाईलवर संपर्क करण्यात आल्याने त्याची ओळख पटली.

मृतकाचे नाव दिपक सुधाकर सोनोने वय २१ रा.डिडोळा ता.मोताळा असे आहे. या घटनेत मृतकावर दगडाने किंवा काठीने जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या ओपन सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल ३० फूट मारेकऱ्यांनी मृतदेह फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले आहे.
‌ या घटनेत मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या
त्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी? या प्रश्नामुळे धरणगांवात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ स्थानिक तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पोलिस तपास आहेत.

0 9 3 8 3 5
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *