वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला

Khozmaster
2 Min Read

नाशिक )- शहरातील वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

अमृतधाम परिसरातील संपत बापुराव हिवराळे (रा.साईनगर,अमृतधाम) हे मंगळवारी (दि.११) रासबिहारी मेरी लिंक रोड भागात गेले होते. निर्मलनगर पोलीस चौकी समोरील मंगलमुर्ती हार्डवेअर दुकानाशेजारी त्यांनी आपली प्लॅटीना एमएच १५ ईजे ५९५७ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील त्रिमुर्ती चौकात घडली. याबाबत विपुल मुकूंद पाटील (रा.शिवपुरी चौक,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील मंगळवारी (दि.११) त्रिमुर्तीचौक भागात गेले होते. त्रिमुर्ती लॅब समोर पार्क केलेली त्यांची शाईन एमएच १५ एचएफ ९४३० दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौदळे करीत आहेत.

तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. सर्वेश शांताराम सोनवणे (रा.त्रिकोणी गार्डन समोर काठेगल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे गेल्या गुरूवारी (दि.६) नाशिकरोड भागात गेले होते. रेल्वेस्थानक परिसरातील रोहित एन्टरप्रायझेस पे अ‍ॅण्ड पार्कच्या वाहनतळावर त्यांनी आपली एमएच १५ एचटी ९४४० दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0 9 3 8 3 5
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *