मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता?

Khozmaster
2 Min Read

मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. रविवारी १६ जून दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 

पश्चिम रेल्वे-

पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नाही. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भायंदर स्थानकांदरम्यान मध्यरात्री ब्लॉक घेतला जाईल.

मध्य रेल्वे-

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.

परिणाम-

सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुढे जलद मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. अशी माहिती रेल्वे यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या लोकल स्थानकांवर अप जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे-

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन लाइनवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.

परिणाम-

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन लाइनवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरयोस होऊ शकते.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पनवेल/बेलापूर/वाशी येथून जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीकडे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

0 9 3 7 3 9
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *