वाद मिटवण्यासाठी बोलवून तरुणीला मारहाण; तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

Khozmaster
2 Min Read

पुणे: मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेत तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च व २२ मे रोजी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंग मध्ये व वडारवाडी येथील दीप बंगला चौकात घडला आहे.

याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३२ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. १९) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रतीक बाळकृष्ण काकडे (३०), प्रज्योत बाळकृष्ण काकडे (३२, रा. बालाजी अपार्टमेंट, नवी सांगवी) आणि आश्विन पवार (२९, रा. वसई) यांच्यावर विनयभंगासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात. आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते. मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक याने फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बोलवून घेतले. फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपी प्रज्योत त्याठिकाणी होता. त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या.

आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन दीप बंगला चौकात अडवून शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतीक याने बोलवून घेतले. त्यावेळी आरोपींनी अश्लील बोलून शिवीगाळ केली. तर प्रज्योत आणि आश्विन यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील या करत आहेत.

0 9 3 8 3 6
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *