वाहनांची जाळपोळ व तोडफोड, १२ जण घेतले ताब्यात
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर; पोलिस ठाण्यावर दगडफेक हल्ला केला जामनेरात पोलिसांचा हवेत गोळीबार, अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.जामनेर : तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपीला आरोपी सुभाष भिल गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला आणि ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते. यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे.