पालघर :सौरभ कामडी
आज दि 18/6/2024 रोजी जि प शाळा कोचाळे येथे स्टार्स प्रकल्प अंतर्गत जि प शाळा कोचाळे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा दोन हा अतिशय उत्साहापूर्ण वातावरनात संपन्न झाला. या मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच या सर्व नवगत विद्यार्थी साठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता.विविध प्रकारच्या टोप्या व त्यावर लिहलेले माझे शाळेचे पाहिलं पाऊल, आकर्षक रांगोळी , रंगबिरंगी फुग्यांची शालेय आवारात सजावट सेल्फी पॉईंट हे या मेलाव्याच आकर्षण होत. सर्व विद्यार्थ्यांची प्रथम गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली नंतर शाळेत आल्यावर इयत्ता पाहिलीतील नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले तसेच या मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थी नोंदी करुन त्यांना 7 स्टॉलवर बालकांच्या कृती विकास नोंदपत्रकावर नमूद करण्यात आल्या.. या नोंदी घेण्यासाठी गावातील तरुण प्रतिनिधीचें सहकार्य मिळाले.. या कार्यक्रमासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक ,गावातील शिक्षणप्रेमी ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक . दिनकर फसाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक राजाराम जोशी सर , गणेश वाघ सर , दिनेश ठोमरे सर यांनी मेहनत घेतली….
Users Today : 39