आजारी बहिणीचा गळा दाबून खून केला, आत्महत्येचा बनाव रचला; हडपसरमधील धक्कादायक घटना

Khozmaster
2 Min Read

पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसरमधील वैदुवाडी परिसरात उघडकीस आला. आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर ताे खून आपण केल्याची कबुली १८ वर्षीय भावाने दिली.

याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात दाखल सुरुवातीला अकस्मात झालेली मृत्यूची नाेंद बदलून तरुणाविराेधात शनिवारी (दि.२२) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार साेमवारी (दि.१७) राेजी घडला.

साफिया सुलेमान अन्सारी (१६, रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, वैदवाडी, हडपसर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारीख सुलेमान अन्सारी (१८) याच्याविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया आजारी असायची. तिच्यावर कुटुंबीयांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची. घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजीदेखील असाच प्रकार घडला. मयत साफिया भाऊ शारीख याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली. दोघांत झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीख याने तिचा गळा दाबला, यात साफियाचा मृत्यू झाला.

त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली, असे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आला होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबूल दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोडवे करत आहेत.

0 9 3 8 3 6
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *