धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण मागणीला यश

Khozmaster
1 Min Read

धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या पुढाकारामुळे कोरोना महामारी मध्ये कोरोना या रोगाला मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच राज्यातील इतर मयत मुद्रांक विक्रेते ज्यांचे मृत्यू दिनांक- 24/09/2010 रोजी व त्यानंतर नैसर्गिक किंवा अनेक कारणास्तव झालेले आहेत त्यांच्या वारसांना देखील वारसा हक्क आणि त्यांचा मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे..!

कोविड-19 या भयंकर महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणून मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण व्हावा याकरिता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महत्वपुर्ण मागणी करताच ज्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचा मृत्यू झालेले आहेत,त्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना उपजीविकेचे साधन मिळावे या दृष्टीने एक विशेष बाब म्हणून ज्या ठिकाणच्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणच्या जनतेच्या सोयीसाठी जनहितार्थ मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण करण्याबाबत मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करण्यास शासन मंजुरी देण्यात आलेली आहे…!
या संपूर्ण निर्णयाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहे, त्यांच्या या मागणीमुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसाना हक्काचे उपजीविकेचे साधन मिळाले आहे…!

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *