दापोलीत दोन वर्षाच्या लेकरासह आईने संपवले जीवन

Khozmaster
1 Min Read

दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी आणि मुलगा समर अशी दाेघांची नावे असून, ही घटना दापाेली तालुक्यातील गव्हे येथे घडली.

घरातील सर्व मंडळी नेहमीच्या कामाला लागली होती. मात्र, काही वेळानंतर घरातील सिया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. मात्र, ते कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलिस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ही नोंद सुरू असतानाच विहिरीच्या काठावर चप्पल दिसल्या. शंका बळावल्याने विहिरीत शोध घेतला असता माय लेकराचे मृतदेह आढळले.

गळाच्या साहाय्याने ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दापोली पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *