कश्यपी धरणग्रस्तांचा वाद थांबला, गंगापूर धरणासाठीपुन्हा पाणी विसर्ग सुरू

Khozmaster
1 Min Read

नाशिक- कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी विसर्ग करण्यासाठी जलसंपदा विभागाने मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस या धरणामध्ये 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

गंगापूर धरणातील साठा अवघा सतरा टक्के इतका झाला असून याच धरणाचे साठवण धरण म्हणून बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणातून पाण्याचा विसर्ग करून तो गंगापूर धरणात पाणी आणण्यात येत आहे.

 

गेल्या सोमवारी 500 क्युसेक्स वेगाने पाणी पाण्याचा विसर्ग केला जात असताना कश्यपी ग्रामस्थांनी त्यांच्या विविध वागण्यासाठी आंदोलन केले आणि पाणी विसर्ग रोखण्याची मागणी केली. दरम्यान,जलसंपदा विभागाने पाण्याचा विसर्ग थांबवला नसला तरी 500 ऐवजी 225 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास प्रारंभ केला त्यामुळे पाण्याचा तांत्रिक लॉस देखील वाढणार होता. दरम्यान जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली त्यांनी मागण्या मान्य केल्यानंतर अखेरीस गंगापूर साठी पाणी सोडण्यास कश्यपीचे ग्रामस्थ तयार झाले त्यानंतर आता पुन्हा 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग आज पासून सुरू झाला आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *