नागपूर : क्रॉंक्रीट मिक्सर मशीन ट्रक रिव्हर्स घेताना जमीन दबल्यामुळे ट्रक उलटून मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनसिंह भिमसेन परते (३४, रा.
खुकसर, जि. मंडला मध्यप्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तर लखन गौतम इंगळे (३३, रा. न्यु पुर्नवसन खापरी) व संतोष उद्धवराव डोंगरे (५०, रा. रोहिणी गृहनिर्माण सोसायटी, परसोडी, वर्धा रोड) अशी आरोपींची नावे आहेत. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ जूनला दुपारी १२.३० वाजता अंकीत जेन (३४) यांच्या धानोली गुमगाव येथील फार्म हाऊसवर अनसिंह मजुरी करीत होता. क्रॉंक्रीट मिक्सर मशीनच्या ट्रक चालकाने सुपरवायझरच्या सांगण्यावरून ट्रक रिर्व्हस घेतला असता तेथील जमीन दबल्याने मिक्सर मशीन ट्रक क्रमांक एम. एच. ३१, एफ. सी-५९०२ खाली पटली होऊन त्यात अनसिंह परते दबून त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला होता. तपासात ट्रक चालक हे अनसिंहच्या मृत्युस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.