मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या जन्माच्या ठिकाणाच्या पुराव्यासाठी आधार कार्डच अनिवार्य करावे तसेच १५ जुलै ही तारीख कायमची रद्द करून सर्वांना लाभ देणे द्यावा…..! धर्मवीर आमदार श्री. संजुभाऊ गायकवाड…!

Khozmaster
2 Min Read

आज दिनांक २ जुलै २०२४ रोजी विधिमंडळ पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बोलताना दरम्यान आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाने माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना यावर महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला..!
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की..!
लाडकी बहीण योजनेमध्ये जन्म तारखेचा दाखला हा अनिवार्य केलेला आहे परंतु अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे कागदपत्रे जळून खाक झालेली आहे, त्यांचे दाखले मिळत नाही, टीसीवर त्यांचा जन्म कुठे झालेला आहे याचे ठिकाणाची नोंद नाही,आणि यामुळे त्या महिलांना एका कागद कागदामुळे त्या योजनेपासून दूर रहावे लागत आहे,आणि त्यामुळे या योजनेसाठी आपण ज्याची नोंद नसेल त्यांच्या करिता आधार कार्ड हे अनिवार्य केलं पाहिजे, यामुळे खऱ्या अर्थाने त्या महिलांना न्याय मिळेल, आणि एकटा तहसीलदार सर्व महिलांना उत्पन्नाचे दाखले देऊ शकत नाही त्यामुळे, त्या ठिकाणच्या नायब तहसीलदारांना अधिकार देऊन सर्वांना उत्पन्नाचे दाखले मिळावे याकरिता मदत होईल तसेच या योजनेसाठी जी १५ जुलै तारीख दिलेली आहे, की तारीख काढून टाकण्यात यावी जेणेकरून पात्र महिलांना लाभ मिळत राहील….!
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या लाडकी बहिणी योजना या प्रश्नावर उत्तर देताना सन्माननीय मंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की..!
माझी बहीण लाडकी या योजनेसंदर्भात जो मुद्दा उपस्थित केला त्या योजनेमध्ये सुसूत्रपणा आणण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून दोन्ही मुद्द्यांचा त्यामध्ये विचार केला जाईल असे सांगितले….!

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *