डबक्यात पोहणे बेतले तरुणाच्या जिवावर; पाय गाळात रुतल्याने बुडून मृत्यू

Khozmaster
1 Min Read

नवी मुंबई: जुईनगर येथील रेल्वे रुळालगतच्या डबक्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तीन मित्रांची दारुपार्टी झाल्यानंतर ते पोहण्यासाठी गेले होते.

यावेळी एकाचा पाय गाळात रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

राज सनगरे (२८) असे मृत तरुणाचे नाव असून तो जुईनगर सेक्टर २३ परिसरात राहणारा आहे. मंगळवारी दुपारी तो व त्याच्या इतर दोन मित्रांनी दारुपार्टी केली होती. त्यानंतर तिथेही त्याच परिसरात रेल्वेरुळालगत असलेल्या डबक्याच्या ठिकाणी गेले होते. यावेळी राज हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र काही वेळ पोहल्यानंतर दम लागल्याने तो थांबला असता गाळात त्याचा पाय रुतल्यामुळे तो बुडाला.

नेरुळ पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक प्रयत्नानंतर अखेर संध्याकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह हाती लागला. या घटनेची नेरुळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मित्रांकडे केलेल्या चौकशीत ते दारुपार्टीनंतर पोहण्यासाठी त्याठिकाणी गेले असता राज सनगरे याचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले.

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *