कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

Khozmaster
1 Min Read

मुंबई : अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. एकावर एक मजले चढवलेली चार ते पाच घरे या दुर्घटनेत कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्या आहेत.

 

कुर्ला पश्चिमेकडे राधानगर चाळीत ही दुर्घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. एकमेकांना खेटून असलेल्या एक मजली झोपड्यांची ही चाळ अचानक दुपारी कोसळली. विटांचे बांधकाम आणि पत्र्यांचे छप्पर असलेली ही निवासी चाळ पूर्णत: जमीनदोस्त झाली. दुर्घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली व बचाव कार्य हाती घेतले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अफ्रीन शेख (२५), रसिका नाडार (३५) आणि एक्स्टर नाडार (६७) अशी या तीन महिलांची नावे आहेत. अफ्रीन हिच्या चेहऱ्याला व मानेला दुखापत झाली आहे, तर अन्य दोघींच्या शरीरावर जखमा असून, त्यांना मुका मार लागला आहे. तिघींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अंधेरी-कुर्ला मार्गावरील जरीमरी परिसरात रविवारी दुपारी चाळ कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले.

0 9 3 7 4 3
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *