विधिमंडळ पक्षाची २ डिसेंबर रोजी बैठक, ५ डिसेंबर रोजी नवीन मुख्यमंत्री घेणार शपथ; मुंबईतील आझाद मैदानावर होणार शपथविधी सोहळा !!

Khozmaster
3 Min Read
मुंबई:-(मंत्रालय प्रतिनिधी)
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप तरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी गोपनीयता ठेवलेली आहे मात्र,शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त ५ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आला असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबरला पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून,त्यात विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. पक्षातील मतभेद दूर करण्यासाठी ही बैठक होणार आहे.त्याचवेळी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे राजकीय नेते सहभागी होणार आहेत.
महायुतीमध्ये मंत्रिपदावरुन मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु असल्याने संभाव्य बंडखोरी शमविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी कमालिची गोपनीयता बाळगली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने भारतीय जनता पार्टी,शिवसेना शिंदे गट आणि आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने २३० जागांवर दणदणीत विजय नोंदवला. पण,आता मंत्रिपदांच्या विभाजना बाबतचा वाद आणखी वाढला आहे.शिवसेना शिंदे गट गृहमंत्रालयाच्या मागणीवर ठाम आहे, तर भारतीय जनता पार्टी ती सोडायला तयार नाही.वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला गृह,अर्थ आणि ग्रामीण विकास मंत्रालये स्वतःकडे ठेवायची आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटाला उद्योग,आरोग्य,कृषी आदी खाती देऊ करण्यात आली आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष
या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींचा लाडका भाऊ काळजीवाहू मुख्यमंत्री सेनेचे शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सहमती दर्शवली असली तरी गृहमंत्रालयावरील त्यांचा दावा कायम आहे.२९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे थेट सातारा गावी गेले.एकनाथ शिंदे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात,असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.महायुतीच्या विजयात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असल्याने बिहार मॉडेलप्रमाणे त्यांना मुख्यमंत्री करावे, अशीही मागणी काही नेत्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत गोपनीयता अजूनही कायम
मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.एकीकडे आरएसएसकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी अंतिम झाल्याचे बोलले जात आहे.त्याचवेळी मराठा प्रश्न पाहता नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आधी फडणवीस हे मागील टर्ममध्ये मुख्यमंत्री होते आणि भाजपसाठी विश्वासार्ह चेहरा आहेत.फडणवीस यांना गृहखाते स्वतःकडे ठेवायचे असल्याचे बोलले जात आहे.शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना स्वत:साठी या पदाची मागणी करत आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये होणार शपथविधी
५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात महायुतीतील दिग्गजांचा मेळावा होणार आहे.त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.पक्षाच्या एकजुटीचे आणि ताकदीचे दर्शन म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात आहे.त्याचवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटातील उपमुख्यमंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
राऊंतांनी भाजपवर साधला निशाणा
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.संजय राऊत म्हणाले की,एवढा मोठा विजय मिळूनही भाजप सरकार स्थापन करण्यास विलंब का करत आहे.बहुमत असूनही भाजप महायुतीच्या नेत्यांना विश्वासात घेऊ शकत नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीनच रंगत आली आहे.
0 6 2 5 7 4
Users Today : 210
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *