शाहू महाराजांचा पुतळा मेडिकल चौकात उभारण्याची मागणी तीव्र, ‘आक्रमण’ संघटनेचे धरणा आंदोलन
नागपूर | 26 जून 2025
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त “आक्रमण युवक संघटनेच्या” वतीने मेडिकल चौक येथे अभिवादन व धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने मेडिकल चौकात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल’ या चर्चित पुस्तकाचे लेखक व पत्रकार मिलिंद कीर्ती उपस्थित होते. त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई नाखले, अलकाताई माटे, रवींद्र पाटील, जिल्हा संयोजक ओपुल तामगाडगे, कार्याध्यक्ष विशाल बनसोड, व जिल्हाध्यक्ष धनराज हाडके मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रारंभी समाज प्रबोधनकार अविनाश साखरकर यांनी आंबेडकरी चळवळीवर गीत सादर करत वातावरण भारावून टाकले.
प्रमुख मार्गदर्शक मिलिंद कीर्ती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शाहू महाराज हे खरे अर्थाने बहुजनांचे राजे होते. त्यांनी आपल्या संस्थानात 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा करून सामाजिक न्यायाचा पाया रचला. माणगाव परिषदेमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे नेते ठरतील, असा दूरदृष्टीपूर्ण विचार मांडला होता. आज देशाला त्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्यपद्धतीची गरज आहे.”
‘आक्रमण’ ही केवळ संघटना नसून अन्यायाविरुद्ध लढणारे आंदोलन आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले. मेडिकल चौक येथे शाहू महाराजांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत मैदानात उतरले होते. “शाहू महाराजांचा पुतळा लावाच, अन्यथा विधानभवनाचा घेराव होईल”, अशा शब्दांत संघटनेने शासनाला इशारा दिला. येत्या हिवाळी अधिवेशनात पुतळा उभारणी न झाल्यास मुख्यमंत्री व खासदारांना रोखण्यासाठी ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज हाडके यांनी केले, तर प्रास्ताविक ओपुल तामगाडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतामध्ये जिल्हा उपाध्यक्ष रोशन ठवरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुरज पुराणिक, जिल्हा सचिव अश्विन पाटील तसेच समीर शाहू, अतिश शंभरकर, आदेश रामटेके, ऋषी धोलारे, दीपक पाटील, विकी वानखेडे, सनी शेंडे, दर्शन तामगाडगे, सुंदरजी भालावी, पंकज टवरे, श्रीकांत फुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
“टॉप ट्रेंडिंग ख़बरें”
पढ़ने के लिए लिंक पर क्लिक करें।”👇👇👇👇👇👇👇👇👇
👉 स्मार्ट शौचालय में अवैध वसूली — BJP पदाधिकारी गोपाल नगदीया ने NMC की पोल खोली, वीडियो वायरल
Users Today : 33