खेडूला कुणबी समाजाच्या इतिहासात अभिमानाचा क्षण – रजत श्रीराम पत्रे यांचा भव्य सत्कार
नागपूर (22 जून):
अखिल खेडूला कुणबी समाज, नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच I.A.S. अधिकारी बनलेल्या रजत श्रीराम पत्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील रजत पत्रे यांनी नुकतीच UPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून खेडूला कुणबी समाजाचे पहिले IAS अधिकारी होण्याचा मान पटकावला.
या गौरव सोहळ्याचे आयोजन 22 जून रोजी आशीर्वाद नगर, म्हाळगी नगर चौक येथील समाज भवनात करण्यात आले होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि बळीराजांच्या प्रतिमांना माल्यार्पणाने झाली.
कार्यक्रमात 10वी, 12वी तसेच UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह, डॉक्टरी अभ्यासक्रम (MBBS/MD), क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे 160 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंतांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी 400 ते 500 नागरिकांची उपस्थिती होती.
समारंभात अध्यक्ष म्हणून प्रभाकरराव पिलारे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. उद्घाटन अॅड. अनिल ठाकरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. अभिविलास नखाते (संचालक, शिवतीर्थ), प्रशासकीय अधिकारी विवेक तोंडरे (MCED, संभाजीनगर) व सत्कारमूर्ती श्री. रजत श्रीराम पत्रे (IAS) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुधाकर भर्रे (सचिव) यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर अलोणे आणि कु. पायल पारधी यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
रजत पत्रे यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समिती, नागपूर विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अनंतराव भारसाकळे, बाळाभाऊ शिंगणे, मोरेश्वर फुंडे, किशोर येडे, चेतन वडे, क्षितिज ढोबळे, दिनेश हरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण राऊत, दयारामजी सहारे, मनोहर कुथे, वसंतराव देवढगले, मोरेश्वर दोनाडकर, गोपीचंद पारधी, चंद्रकांत राऊत, पुरुषोत्तम भोयर, अमोल राऊत, मनमीत पिलारे, सुरज ढबाले तसेच महिला वर्गातून सौ. सुनिता अलोणे, सौ. रूपा अलोणे, सौ. स्वाती राऊत, कु. मैत्री राऊत यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सांगता माजी अध्यक्ष मुरलीधरजी भर्रे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली व राष्ट्रगीताने समारंभाची सांगता करण्यात आली. संपूर्ण सोहळा समाजातील एकतेचे, प्रेरणेचे आणि गौरवाचे प्रतीक ठरला.
“टॉप ट्रेंडिंग ख़बरें”
पढ़ने के लिए लिंक पर क्लिक करें।”
👇👇👇👇👇👇👇👇👇
पुणे से नागपुर तक ट्रैफिक से बेहाल जनता: गडकरीजी खुद बने सिस्टम की विडंबना का हिस्सा
👉 स्मार्ट शौचालय में अवैध वसूली — BJP पदाधिकारी गोपाल नगदीया ने NMC की पोल खोली, वीडियो वायरल
Users Today : 33